" तिळगुळ घ्या गोड बोला "
मराठी कट्टा म्हणलं की प्रामुख्याने जाणवतो तो म्हणजे उत्साह! मराठी कट्टा म्हणजे प्रेम ,जिव्हाळा , आपुलकी , नव्या नव्या आणि हव्या हव्या नात्याचा सुगंध!
लग्नानंतरचे सगळेच सण नवीन अनुभव, नवीन बंध निर्माण करतात. नवीन नात्यांना जवळून अनुभवण्याची संधी देतात.
परदेशात वास्तव्यास असणाऱ्या नवीन जोडप्यांना आणि चिमुकल्यांना आपल्या माणसांची कमतरता भासत असतेच. तीच उणीव अंशतः कमी करण्याचा मराठी कट्ट्याचा प्रयत्न असतो. आपल्या संस्कृतीचे जतन करत मायेची ही ऊब मराठी कट्टा सदैव जपत असतो.
असाच एक गोड क्षण ह्या वर्षाच्या सुरुवातीला सगळ्या कट्टा परिवारासोबत अनुभवायला मिळाला. 2020 या नवीन वर्षाची सुरवात बोरन्हाण, हळदी कुंकू आणि हलव्याच्या दागिन्यांची हौस यांनी होऊन मकरसंक्रांतीचा हा सण 18 जानेवारी रोजी पार पडला.
जेव्हा एखादं कार्य आपण सामाजिक बांधिलकीतून करतो,संस्कृतीचं जतन करण्यासाठी करतो व देश प्रेमामुळे आणि आत्मिक समाधानासाठी करतो तेव्हाच ते कार्य ख-या अर्थानी पूर्ण होतं ; हसत खेळत, लहान मोठ्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभारानेच हे शक्य होतं आणि ह्या पुढेही संस्कृतीचं हे रोपटं असंच वाढत राहो हीच इच्छा !
याच कार्यक्रमातील काही गोड क्षण😊