This post consists of an essay written for the essay competition Marathi Katta Germany had for their 5th Anniversary. This essay is written by Amol Sonaikar.
हा विषय काहीसा निराळाच आहे. पण सगळ्या जुन्या नव्यांना काहीसा आपलाच वाटेल. सुरुवातीलाच जुने आणि नवे हे मी मराठी लोकांबद्दल बोलत आहे हे लक्षात आणून देतो. याचे कारण मी जर्मनी मध्ये २०१० ला आलो . १ वर्ष Karlsruhe , त्यानंतर ५ वर्षे बॉन आणि आता दोन वर्षे फ्रांकफुर्त ला काढल्यावर काही अनुभव जे आले त्यातले पुनःपुन्हा आलेल्या अनुभवांचा हा सारांश . यातील काही नवे जरी बदललेली असली तरी अनुभव अस्सलच आहेत.
सुरुवातीलाच karlsruhe ला आल्यावर मराठी लोकांचा शोध चालू केला होता. आल्या आल्या अनेक लोकांशी ओळखी झाल्या . याचे कारण केवळ त्या होण्यासाठी दररोज संध्याकाळी इंडियन स्टोर ला चक्कर मारून येणे आणि तिथे त्यातल्या त्यात इंडियन दिसणाऱ्या माणसाशी बोलायला सुरुवात करून मग त्यांची चौकशी करून कुठले काय , मग मातृभाषा माहित करून घेणे झाले. यातून माहिती झालेले ९० टक्के लोक श्रीलंकन तामिळ होते आणि ५ टक्के लोक भारतीय आणि उरलेले ५ टक्के अफगाणी किंवा पाकिस्तानी निघत असत. मग रात्री इंडियन रेस्टॉरंट ला थाळी खात इकडे तिकडे मराठी चा शोध घेणे चालूच होते. शेवटी हॉटेल वाल्यानेच क्रिकेट खेळायला बोलावले ( तो पंजाबी होता
आणि त्याच्या क्रिकेट टीम मध्ये ६ जण पाकिस्तानी होते.)
तिथेच अभि भेटला , तो मराठीच होता आणि karlsruhe ला बरीच वर्षे राहिलेला आणि बोलायला भन्नाट. त्याचे पूर्ण कुटुंब जर्मनी मध्ये स्थायिक होते. अस्सल पुणेरी मराठी कानावर पडत होते. आम्ही नंबर exchange केले . तोवर यथावकाश आमची फॅमिली पण येथे आली होती. काही मराठी विद्यार्थ्यांची ओळख झाली होती, पण एका महिन्यातच त्यांचे खरे रुप समोर आले होते. केवळ समोर चा माणूस नोकरी करणारा आहे म्हणून त्याचा फायदा उठवून त्याच्या पैशानी दारू आणि पब यांची चैन करणे आणि त्यांना पुढे करून त्यांच्या ग्रुप तिकिटामध्ये स्वतः फिरून घेणे या वृत्ती प्रामुख्याने समोर आल्या होत्या. (याला अपवाद आहेत आणि ते कट्ट्यासाठी खूप करतात , त्यांच्याबद्दल हे नाही.)
तर या अभि ला मी दिवाळीच्या (२०१०) सुमारास एकदा घरी ये असे सांगायला फोन केला. माझी बायको प्रीती याबाबत अधिक हुशार . तिने आधीच सांगितले कुणालाही एक्दम जेवायला ना बोलावता आधी general गप्पा माराव्यात आणि तो काय म्हणतो हे लक्षात घ्यावे. त्याप्रमाणेच हा फोन करून बघितला. बराच वेळ गप्पा मारल्यावर मग सहज म्हटले कि भेटूया दिवाळी मध्ये. फराळाला. लगेच साहेबांनी त्यांचा social परिचय देण्यास सुरुवात केली. उदा. 'अरे अमोल , आम्ही ना आमच्या कंपनी च्या लोकांना अमुक दिवशी बोलावले आहे , त्यानंतर तमुक दिवशी आमच्या संस्थेशी संबंधित लोकांना बोलावले आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही इथे जुने भारतीय लोक भेटणार आहोत. अमी या सगळ्या मीटिंग अशा विशिष्ट ग्रुप संदर्भात आहेत , यांच्यात त्याच्या बाहेरचे कोणी नाहीत. (वास्तविक मी त्याला
म्हटलेच नव्हते कि मी तुझ्याकडे येतो , उलट मीच त्याला बोलावणार होतो , पण त्या आधी त्याने एवढी प्रस्तावना दिली ). एवढे ऐकूनही मी त्याला सौजन्य म्हणून म्हटले कि अरे तू ये शनिवारी किंवा रविवारी. ' त्यावर थोडा वेळ शांतता ( आणि बहुधा खजील झाला असावा) , आणि पुन्हा अरे एवढी काही फॉर्मॅलिटी ची गरज नाही , आपण भेटूच कि, असे म्हणून फोन ठेवला.
आम्ही नंतर karlsruhe ला कधीच भेटलो नाही . नंतर मी बॉन ला शिफ्ट झाल्यावर असाच अनुभव दोन वेळा आला . शेवटी नवीन मराठी संबंध ठेवणे बरे असे वाटून त्यांच्याशी (बॉन मधील जुन्या मराठी लोकांशी ) संबंध ठेवण्याचे प्रयत्न हि केले नाही. याच सुमारास IBM च्या project मुळे बॉन मध्ये एकाएकी मराठी लोकांची संख्या वाढू लागली. काही उत्साही मंडळीनि मला जर्मनी मधला जुना जाणता माणूस असे सांगून याला काही विचारा असे पसरवून दिले. मग काय विचारता , प्रश्न कधी कुठे केव्हा कसे येत राहतील याला धरबंध राहिला नाही. कोणी ऑफिस मध्ये एक्दम येऊन किराणा कुठे चांगला मिळतो यापासून ते युरोपात स्वस्तात कसे फिरायचे यावर चर्चासत्रे सुरु केली . म्हणजे माझा Advice घ्यायला तर यायचे पण तिथेच स्वतःच्या internet वरील ज्ञानाचे प्रदर्शन करायचे. आणि मग तू इतकी वर्षे इथे असून तुला एवढे कसे माहित नाही असा एक शेलका टोमणा मारून जायचे. मला स्वतःला पब दारू आणि इतर विषयात कमी रस असल्याने त्यावरही lecturebaji चालायची.
शेवटी कंटाळून यांच्याशी व्यक्तिगत संबंध कमी केले तर अत्यंत खडूस आणि शिष्ट म्हणून बदनामी झाली ती झाली. अर्थात यात हि काही जुन्या मराठी कुटुंबांनी मला खूप मदत केली . ( विशेष आभार पंकज घारपुरे आणि सोनाली घारपुरे ) त्यांनी मला सांगितले कि या temporary जर्मनी मध्ये येणाऱ्या लोकांची मेन्टॅलिटी एक असते , यांना फक्त पैसे जमवायचे आणि भारतात SAVE कसे करता येईल ते बघायचे असतात. येथे दीर्घ काळ राहिले तर जर्मन भाषा शिकावी लागेल , मुलांना इथल्या शाळेत घालावे लागेल अशी यांना भीती असते , आणि जर परत भारतात जायचे झाले तर मुले
परत इंग्रजी शाळेत कशी अड्जस्ट होणार याचेच टेन्शन असते. आणि हि लोकं आपला इथला सोन्यासारखा वेळ याच विषयांवर चर्चा करत घालवतात . आणि पुन्हा आपल्यालाही घाबरवून सोडतात. यांच्या पासून दूर राहून तोच वेळ अजून फॅमिली ला दे आणि त्यांच्याबरोबर घालावं असा सल्ला त्यांनी दिला. ( आणि तो मोलाचा होता ). आणि यात मलाही कळले कि अभि मला karlsruhe ला का टाळत होता. बरोबरच आहे , इथे इतक्या आनंद घेण्यासारख्या गोष्टी असताना अशा नकारात्मक संगतीची गरजच काय असे वाटते. एव्हाना मी बॉन मध्ये settle झालो होतो आणि कदाचित थोडा अभि सारखा हि झालो. पण याच सुमारास (२०१४ जुलै) Montabaur ला मराठी मित्र
मंडळामुळे अजित रानडे शी ओळख झाली. तोही नवीन होता आणि त्याने नुकताच मराठी कट्टा फ्रॅंकफुर्ट चालू केला होता. बराच वेळ गप्पा मारल्यावर त्याने त्याचे अनुभव सांगितले . कि नवीन मराठी लोकांना येथे येतांना किती त्रास होतो आणि घर शोधण्यापासून ते foreign ऑफिस ची appointment घेण्यापर्यंत किती अडचणी येतात ते सांगितले . त्यांना मदत करण्यासाठी कट्टा बनवला असेही तो म्हणाला. त्यावेळी असेही वाटले कि अगदीच या अभि सारखे राहून
चालणार नाही , कुठेतरी पुढे येऊन नवीन लोकांना मदत केलीच पाहिजे.
याच सुमारास माझा जॉब बदलून आमची हि फ्रॅंकफुर्ट शिफ्ट होण्याची तयारी सुरु झाली . माझे काम तर इथे चालू होतेच त्यात शाळा शोधणे आणि भारतीय शोधणे सुरु झाले . येथे भारतीय आणि मराठी लोकसंख्या बरीच असल्याने त्रास झाला नाही. पण फॅमिली friend करायचे म्हटले आणि पुन्हा एकदा जुने आणि त्यांच्या भिंती आड आल्या. बऱ्याच लोकांनी सांगितले कि जुने लोक तुला कधी जवळ करणार नाहीत कारण त्यांना त्याच्या closed ग्रुप मध्ये राहायला आवडते. ते म्हणजे एका हाताची पाच बोटे आहेत, किंवा तो दुसरा ग्रुप म्हणजे सप्तसूर आहे तिथे आठव्याला स्थान नाही. ज्या काही जुन्या लोकांनी सुरुवातीला चांगली ओळख दिली त्यांनी नंतर ग्रुप बनवायचा का असे म्हटल्यावर अरे आमचा ऑलरेडी एक ग्रुप आहे. आणि त्यांना नवीन लोक आवडत नाहीत असे सांगितले. कारणे
बरीचशी वर अभि ने दिल्यासारखीच होती.
पण आता मीच स्वतः अभि सारखा वागत असल्याने या गोष्टी मी माझ्या परीने हॅन्डल करायचे ठरवले होते, आणि याची सुरुवात अजित च्या मदती ने झाली. त्याने जर्मनी मधल्या मराठी मंत्रीमहोदयांच्या भेटी साठी बोलावले , आणि त्या कार्यक्रमाला सगळे जुने जाणते लोक होते , त्यात बऱ्याच लोकांशी वैयक्तिक ओळखी झाल्या. अजित ने २०१५ चा दिवाळी प्रोग्रॅम फ्रांकफुर्त मध्ये मोठ्या प्रमाणावर केला आणि त्यात बॉन ला राहत असूनही मी बराच सहभाग नोंदवला . Accenture च्या बऱ्याच नवीन लोकांना या कार्यक्रमाला बोलावले. इथेच काही जुन्या लोकांशी ओळख झाली . अर्थात या असल्या ओळखी तात्पुरत्या असतात याचा पुरेपूर अनुभव होता (विशेषतः जुन्या लोकांबरोबर ) , कारण ते अशा कार्यक्रमात आपल्या च मित्र मैत्रिणीशी बोलत असतात आणि त्यांना नव्यांशी फारसे देणे घेणे नसते . (याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही , कारण नवे लोक कसे वागतात हे वर आले आहेच) . पण इथे मीच नवा असल्याने मला हि तेच
वागणे सहन करावे लागलेच.
परंतु यामध्ये हि माझ्या काही मित्रांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले (विशेषतः बॉन चा योगेश बिडकर) , त्यानेही स्पष्ट सांगितले कि उगीच भारंभार ओळखी वाढवू नकोस , जुन्या लोकांशी परिचय कर पण त्यांच्या मागे लागू नको. ते स्वतः होऊन तुझ्या जवळ आले तर त्यांच्याशी जवळीक कर. आणि तू चांगला असशील तर चांगले लोक नक्की जवळ करतील . पंकज घारपुरे , योगेश बिडकर यांच्यासारखे मित्र आणि अजित रानडे (संस्थापक मराठी कट्टा जर्मनी) , प्रसाद भालेराव
(संस्थापक मराठी मित्र मंडळ जर्मनी ) यांच्यासारखे जगमित्र यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले .
मराठी कट्ट्यामुळे ओळखी होणे चालूच होते आणि कट्ट्याच्या आनंद भाटे प्रोग्रॅम व दिवाळी २०१६ मध्ये थोडेफार काम केल्याने कदाचित येथे लोक ओळखू हि लागले होते. (दिवाळी २०१६ मध्ये पुण्याहून चितळेंचा फराळ आणून इथे विकणे हाही उद्योग चालू आहेच) आणि या सर्व काळात वर सांगितलेली एका हाताची पाच बोटे कुटुंबीय आणि सप्तसूर
कुटुंबीय आमचे फॅमिली friend कधी झाले हेच कळले नाही.
अजित आणि प्रसाद मुळे एवढे नक्की कळले कि अगदी अभि सारखे वागणे हि बरोबर नाही. नवे लोक तुमच्या वागण्याची बोलण्याची चिकित्सा करणारच . तिथे दुर्लक्ष करावे . आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना करावी , पण त्याबद्दल त्यांच्या कडून थँक यू ची सुद्धा अपेक्षा करू नये हे इथेच शिकलो. यातूनच काही खूप चांगले लोक भेटले , मित्र झाले. अजूनही होत आहेत. खरोखर जर्मनी मध्ये मराठी मित्र मिळवणे हे खाणीत हिरे शोधण्यासारखे आहे. शंभर , हजार किंवा कधी लाख दगड घासून बघितल्यावर एक हिरा सापडतो. पण जेव्हा तो सापडतो तेव्हा होणार आनंद अवर्णनीय
असतो तसे १० , २० किंवा ५० लोकांना फेसबुक , कट्टा किंवा अन्य ओळखीच्या माध्यमातून मदत केल्यावर एखादा मित्र मिळतो तो चिरकाल टिकतो . पण तो मित्र मिळाला याचा आनंद फार मोठा असतो.
अशाच मित्रांच्या प्रेरणेतून प्रीती ने Cake बनवणे आणि योगासने प्राणायामाचे वर्ग यशस्वी पणे सुरु केले आहेत. आणि याचे सर्व श्रेय आमच्या जुन्या आणि नव्या भारतीय मित्रांचेच . तर अशीच आपली जर्मनी मधली मैत्री कट्टा आणि इतर अनेक माध्यमातून वाढवत जाऊ आणि आपली Community समृद्ध बनवू.
अमोल सोनईकर